Breaking News

 

 

‘विरुष्का’साठी इंग्लंडमध्ये ‘ये रासते है प्यार के…’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सतत चर्चेत असलेले कपल म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली होय. वर्ल्डकपमुळे विराट सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याला भेटण्यासाठी अनुष्काने थेट इंग्लंंड गाठले आहे. तिथल्या रस्त्यांवर ‘विरुष्का’ हातात हात घालत फिरताना दिसली आणि इकडे भारतात त्यांचे फोटो व्हायरल झाले.

पाकिस्तानबरोबरच्या विजयानंतर पुढील सामन्याला बराच अवधी बाकी असल्यामुळे भारतीय संघाला ब्रेक देण्यात आला. त्यामुळे विराट-अनुष्का सुट्टीचा आनंद लुटत आहेत. विराटच्या फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर दोघांचे काही फोटो शेअर केले आहेत. भारतीय संघातील खेळाडूंच्या पत्नी आणि कुटुंबिय इंग्लंडमध्ये त्यांच्यासोबत राहत असल्याचे दिसून आले आहे. विराट कोहलीशिवाय रोहित शर्माची पत्नी सामन्यादरम्यान दिसली होती.

546 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा