Breaking News

 

 

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण…

मुंबई (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीनंतर आज (गुरुवार) सलग पाचव्या दिवशी पेट्रोलच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर डिझेलमध्ये ६ पैसे प्रती लिटरनं घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत आहे. त्यामुळे आज (गुरुवार) सकाळी मुंबईत पेट्रोल ७५.६३ रुपये प्रती लिटर तर डिझेल ६६.८७ रुपये प्रती लिटर दरावर पोहचला आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल दर ६९.९३ रुपये प्रती लिटर तर डिझेल ६३.७८ रुपये प्रती लिटर दर आहे, कोलकतात पेट्रोल दर ७२.१९ रुपये, डिझेल ६५.७० रुपये, चेन्नईत पेट्रोल दर ७२.६५ रुपये आणि डिझेल ६७.४७ रुपये, नोएडामध्ये पेट्रोल दर ७०.४५ रुपये तर डिझेल ६३.९१ रुपये, गुरुग्राममध्ये पेट्रोल ७०.३६ रुपये तर डिझेल ६३.२७ रुपये प्रती लिटर आहे.

अमेरिका आणि चीन दरम्यान सुरु असलेल्या ट्रेड वॉरमध्ये काहीतरी मार्ग निघू शकेल, असे संकेत मिळाल्यानंतर कच्च्या तेलाच्या भावांत वाढ होवू शकतो. व्यापारिक तणाव दूर झाल्यानंतर कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

1,242 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा