Breaking News

 

 

विश्वचषक क्रिकेट : ‘गब्बर’बाबत मोठी बातमी !

इंग्लड (वृत्तसंस्था) : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेतून  शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला आहे. या वृत्ताला भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांनी दुजोरा दिला आहे.

टीम इंडियाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली असून बोटाला फ्रॅक्चर आहे. जुलै महिन्यापर्यंत त्याची दुखापत पूर्णपणे बरी होणे शक्य नाही. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली आहे. शिखर धवनच्या जागी आता ऋषभ पंतला बदली खेळाडू म्हणून अंतिम १५ खेळाडूंच्या संघात स्थान मिळावे, अशी विनंती आम्ही केली असल्याचे सांगितले.

1,068 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा