Breaking News

 

 

अभिमानास्पद… : कोल्हापुरी चपलांना मिळाले भौगोलिक मानांकन !

मुंबई (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे वास्तव्याने पुनीत झालेले कोल्हापूर विविध बाबतीत पुढे आहे. कोल्हापुरी बाणा, कोल्हापुरी गूळ, तांबडा-पांढरा रस्सा, खास कोल्हापुरी पाहुणचार याबरोबरच कोल्हापुरी चपला हे कोल्हापूरचे खास वैशिष्ट्य आहे. कोल्हापुरी चपलांबाबतचे आकर्षण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कोल्हापुरी चपलांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता कोल्हापुरी चपलांना भौगोलिक मानांकन मिळालं आहे. महाराष्ट्रातील चार व कर्नाटकातील चार जिल्ह्यात तयार होणाऱ्या चपलांनाच कोल्हापूरी चपलांचा ‘टॅग’ मिळणार आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात तर कर्नाटकमधील धारवाड, बिजापूर, बागलकोट, बेळगाव या जिल्ह्यात तयार केलेल्या कोल्हापूरी चपलांनाच यापुढे कोल्हापूरी टॅग मिळणार आहे. या जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर कुठेही तयार होणाऱ्या कोल्हापूरी चपला कोल्हापूरी म्हणून ओळखल्या जाणार नाहीत. या मानांकनामुळे आता कोल्हापूरी चपलांची ओळख जागतिक स्तरावर पोहोचणार आहेच त्यासोबत बनावट कोल्हापूरी चपलांना देखील आळा बसणार आहे.

देशातील ३२६ उत्पादनांना आजपर्यंत भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे, यामध्ये महाराष्ट्रातील ३२ उत्पादनांचा समावेश आहे. या उत्पादनात सोलापुरी चादर, पुणेरी पगडी, लासलगाव कांदा, जळगावची केळी, जळगावचे वांग्याचे भरीत, सोलापूरचे डाळिंब, नागपूरच्या संत्र्यांसोबत आता कोल्हापुरी चपलांचा देखील समावेश झाला आहे.

1,257 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा