ओडिशा (वृत्तसंस्था) : येथे १३ जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २९ जानेवारीला होणार आहे. भारतासह १६ संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

१६ संघांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले असून, ४४ सामने होणार आहे. हॉकी विश्वचषकात भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत सिंह याच्याकडे आहे. हॉकी विश्वचषक सलग दुसऱ्यांदा भारतामध्ये होत आहे. दरम्यान हॉकी विश्वचषक २०२३ चे यजमानपद भारताला मिळाले असून, सर्व सामने राउरकेला-भुवनेश्वर, ओडिशा येथे होणार आहेत.

दि. १९ जानेवारीपर्यंत गट सामने आणि २४ जानेवारीपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवले जातील. पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना हा २९ जानेवारीला होणार आहे. १६ संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताचा पहिला सामना १५ जानेवारी रोजी इंग्लड सोबत होणार आहे. दुसरा सामना भारत विरुद्ध वेल्स यांच्यात १९ जानेवारीला होईल.