Breaking News

 

 

ज्यांचे आरोग्य उत्तम तो मनुष्य जीवनात यशस्वी : डॉ. मुकेश प्रजापती

टोप (प्रतिनिधी) : निरोगी शरीरात निरोगी मन वास करते, ज्याचे आरोग्य उत्तम  असेल तो मनुष्य जीवनात यशस्वी होतो, असे प्रतिपादन डॉ. मुकेश प्रजापती यांनी केले. ते टोप येथे आज (मंगळवार) अथायु मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटल, कोल्हापूर, जुगाई क्लिनिक, टोप यांच्या विद्यमाने  आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरावेळी बोलत होते.

या शिबिराचे उद्घाटन पं. स. सदस्य डॉ. प्रदिप पाटील, सरपंच रुपाली तावडे, उपसरपंच विजय पाटील, पिलाजी पाटील, बाबासो पाटील, डी. आर. देवकाते, महादेव सुतार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी छातीत धडधडणे, धाप लागणे, मेंदू व मणका विकार, मूतखडा, लघवी संबंधित तक्रारी, हृदयरोग तपासणी, पोटदुखी या रुग्णांना तपासण्यात आले. यावेळी रुग्णांची ईसीजी आणि मधुमेहाची तपासणी करुन तज्ञ डॉक्टरामार्फत वैद्यकिय सल्ला देण्यात आला. 

या शिबिरात अथायुचे डॉ. पल्लवी कुंभार, डॉ. मुकेश प्रजापती, डॉ. राहुल चौगुले, दिपाली जगताप, सागर कांबळे, चिन्मय ठक्कर, अनिरुध्द सुन, विकी कांबळे यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

756 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा