Breaking News

 

 

चंदगडमध्ये गुरुवारी महाआरोग्य शिबिर…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : केदारी रेडेकर समुहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कै.केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयाच्यावतीने गुरुवार (दि.२०) १० ते २ यावेळेत महाआरोग्य शिबिराचे आयोजन राम मंदीर, चंदगड येथे केले आहे.

या शिबिरात हार्निया, अॅपेंडिक्स, हायड्रोसिल, मुतखडा,  मुळव्याध, भगंधर, थायरॉइड, त्वचारोग, दमा, मोतिबिंदु तसेच स्त्रियांच्या व मुलांच्या इतर आजरांवर तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत. यावेळी उपचार झालेल्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

गरोदर स्त्रियांसाठी मोफत तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरात नोंद झालेल्या गरोदर स्त्रियांसाठी नैसर्गीक प्रसूती तर सिझरीयन पाच हजार रूपयांमध्ये केली जाणार आहे. ० ते १४ वयोगटातील मुलांसाठी मोफत उपचार करण्यात येणार आहेत. या शिबिराचा सर्वांनी लाभ घेण्याचे अवाहन केदारी रेडेकर समुहामार्फत करण्यात आले आहे.

1,674 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा