Breaking News

 

 

आज पुन्हा ‘मास्तरांवर’ भडकले सीईओ मित्तल…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदमध्ये गेले महिनाभर शिक्षकांच्या बदलीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला काळिमा फासला असाच सूर संपूर्ण जिल्ह्यात पसरला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे देखील या बदली प्रकरणाने चांगलेच वैतागले आहेत. तरीही त्यांच्या दालनाकडे शिक्षकांच्या फेऱ्या काही थांबलेल्या नाहीत यामुळे आज दालनासमोर थांबलेल्या शिक्षकांवर भडकून थेट बदलीच्या ठिकाणी जाऊन काम करण्याचे आदेश दिले.

आज सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी दालनात येणार आहेत हे समजताच बदली झालेल्या शिक्षकांनी गर्दी केली होती. थोड्या वेळातच मित्तल या ठिकाणी आले. उपस्थित असलेल्या शिक्षकांना त्यांना थेट का आलाय विचारले. शिक्षकानी बदलीबाबत आलो असल्याचे सांगताच चांगलेच भडकले. हे ऐकून त्यांनी “जहा आपकी बदली हुई है वहा जाकर काम शुरू करो” असे म्हणत त्यांनी शिक्षकांना चांगलंच सुनावले त्यामुळे बदलीचा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी आलेल्या शिक्षकांनी निराश होऊन परतीचा मार्ग धरला.

एकंदरीत शाळा सुरू झाल्या असल्या तरी बदली झालेले शिक्षक जिल्हा परिषदेतच अडकून असल्याचे चित्र आज देखील पाहायला मिळाले.

1,008 total views, 15 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा