Breaking News

 

 

ग्रा.पं.कामगारांच्या मागण्यांचे जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत कामगारांसाठी शासनाने लागू केलेल्या आकृतीबंध तात्काळ रद्द करावा, यासह विविध मागण्यांसाठी हातकणंगले तालुक्यातील श्रमिक जनरल कामगार संघटनेच्यावतीने आज (मंगळवार) जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडून ग्रामपंचायत कामगारांच्या किमान वेतनापोटी दिले जाणारे अनुदान थेट ग्रामपंचायत कामगारांच्या खात्यात जमा करावे, ग्रामपंचायत कामगारांना शासनाने लागू केलेल्या राहणीमान भत्ता स्वतंत्ररीत्या मिळावा, त्यामधील फरकाची रक्कम तात्काळ मिळावी, ग्रा.पं. कामगारांची सेवापुस्तके अद्यावत करावीत, नोकरीमध्ये दहा ते पंधरा वर्षे झालेल्यांना तत्काळ कायम करण्यात यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा समाप्तीनंतर मिळणारे लाभ मिळावेत, त्यांना कायद्याने दिली जाणारी ग्रॅच्युइटीची रक्कम ताबडतोब देण्यात यावी. याबाबत कामगार न्यायालय, कोल्हापूर यांनी अनेक प्रकरणात निकाल दिला आहे. या मागण्यांचा विचार न केल्यास आंदोलन करण्यात येण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी भालेराव यांनी याबाबत लवकरच सर्व संबंधित घटकांची मिटिंग घेऊन मार्ग काढण्यात येईल आणि  तातडीच्या  प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश काढण्याचे जाहीर केले.

या शिष्टमंडळात कॉम्रेड सुकुमार कांबळे, कॉम्रेड आप्पा पाटील, प्रियांका मस्कर, औदुंबर साठे, प्रवीण कांबळे, दिनेश लालबेग, नागेश कांबळे, विठ्ठल कांबळे, राजू लाटकर,  उत्तम गेजगे  यांच्यासह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

432 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा