Breaking News

 

 

महापौर उद्या राजीनामा देणार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महापौर सौ. सरिता मोरे उद्या (बुधवार) होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यांची मुदत संपल्याने त्या राजीनामा देणार आहेत. त्यांच्याजागी कोण महापौर होणार, याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

१९ मे रोजी बोलावलेली सर्वसाधरण सभा तहकूब करण्यात आली होती. ही सभा उद्या महापालिकेच्या छ. राजर्षि शाहू सभागृहात होत आहे. या सभेत महापौरांचा राजीनामा अपेक्षित आहे. महापौर होण्यासाठी अनेकजण इच्छुक असून नेते कोणाच्या बाजूने कौल देणार यावरच बरेच काही अवलंबून आहे. नगरसेविका सुरमंजिरी लाटकर, माधवी गवंडी यांनी महापौरपदासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

474 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा