Breaking News

 

 

अयोध्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चार आरोपींना जन्मठेप…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)  : सन २००५ मध्ये झालेल्या अयोध्येतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी प्रयागराज विशेष न्यायालयाने आज (मंगळवार) निकाल दिला आहे. या हल्ल्याप्रकरणी पाचपैकी चार आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर एका आरोपीची मुक्तता करण्यात आली आहे. 

अयोध्येतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आज प्रयागराज येथील विशेष कोर्टात पाच दहशतवाद्यांविरोधात शिक्षेची सुनावणी झाली. राम जन्मभूमी येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी करण्यात येत होती. ५ जुलै २००५ रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास दहशतवाद्यांनी रामजन्मभूमी परिसरात बॉम्बस्फोट घडवला होता. जवळपास अडीच तास चाललेल्या चकमकीत पोलिसांनी पाच दहशतवाद्यांना ठार केले होते. या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीर येथून अटक केली होती.   

अटक केलेल्या चार दहशतवाद्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. त्यानंतर २००६ मध्ये प्रयागराजच्या विशेष कोर्टाच्या आदेशावर त्यांची रवानगी प्रयागराजच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती. रामजन्मभूमी परिसरात हल्ला करुन देशामध्ये धार्मिक दंगली घडविण्याचे षडयंत्र या दहशतवाद्यांनी आखले होते.

264 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा