मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत हिने बॉयफ्रेंड आदिल दुरानीसोबत लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. राखी सावंतने अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये आदिल आणि राखी गळ्यात वरमाला घालून फोटोसाठी पोज देताना दिसून येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’ मुळे प्रचंड चर्चेत होती. राखी आणि आदिल यांच्या हातामध्ये मॅरिज सर्टिफिकेट दिसत आहे. यावरुन दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याचा अंदाज बांधला जात आहे. अभिनेत्री-डान्सर राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते. राखी सतत आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांच मनोरंजन करत असते.

सोबतच राखी आपल्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. राखी गेल्या अनेक दिवसांपासून दुबई स्थित उद्योगपती आदिल दुरानीला डेट करत आहे. राखी आणि आदिल लग्न कधी करणार याची त्यांच्या चाहत्यांना अनेक दिवसांपासून उत्सुकता होती.

आता राखी सावंत आणि आदिल दुरानीने गुपचूप लग्न उरकल्याचे समोर आले आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमणात व्हायरल होत आहेत. मात्र राखी किंवा आदिलने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

दरम्यान, राखी सावंत ही मनोरंजन करीत ‘बिग बॉस मराठी’त टॉप ५ मध्ये पोहोचली होती. राखी ९ लाख घेऊन महाअंतिम सोहळ्यातून बाहेर झाली होती. बिग बॉसच्या घरात फॅमिली वीकमध्ये आदिल दुरानी राखीला भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात सहभागी झाला होता.