गगनबावडा (प्रतिनिधी) :  माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा ‘आपले सरकार’चे व्यवस्थापक नितीन मोहिते यांनी पंचायत समिती येथे केले. ते गगनबावडा तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच व संगणक परिचालक यांच्या ‘आपला गाव आपला विकास’ या कार्यक्रमाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते.

ते म्हणाले, आपला गाव आपला विकास या कार्यक्रमाचा आराखडा करताना आधुनिक करणाचा वापर करून त्या कामाचे अक्षांश व रेखांश याचाही उपयोग कामकाज करताना येणार आहे. त्याशिवाय कामकाजासाठी नऊ प्रकारच्या थीमचाही उपयोग करावा लागणार आहे.

त्यांनी प्रशिक्षणामध्ये ऑनलाइन प्रात्यक्षिक करून दाखवले. गटविकास अधिकारी माधुरी  परीट यांनी ग्रामसेवक सरपंच व संगणक परिचालक यांना मार्गदर्शन केले. यावेळी विस्तार अधिकारी के. टोणपे, गगनबावडा तालुका व्यवस्थापक राकेश पोवार, गगनबावडा तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक व संगणक परिचालक उपस्थित होते.