पहिल्याच दिवशी १० गावांचा दौरा यशस्वी

सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला तालुक्याच्या विकासाचा अजेंडा कायमच उंच पाहण्यासाठी गेली अनेक दशकांपासून सांगोला तालुक्यात साळुंखे-पाटील कुटुंब पळत आहे. हाच विकासाचा अजेंडा सांगोला तालुक्यात आबादीत राहण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या माध्यमातून तालुक्यात गावभेट दौरा हा ९ जानेवारीपासून सुरू केला आहे.

या दौऱ्याच्या माध्यमातून गावामध्ये, वाड्या-वस्तीवर असणाऱ्या अडीअडचणी तसेच महिला सक्षमीकरणासाठी बचत गट किती महत्त्वाचे आहेत. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रामुख्याने हेतू असल्याचे जयमालाताई गायकवाड यांनी बोलताना सांगितले.

या गाव भेट दौऱ्यामध्ये पहिल्याच दिवशी नराळे, हबीसेवाडी, डिकसळ,पारे, हंगिरगे घेरडी, वाकी घेरडी, वाणीचिंचाळे, आलेगाव, मेडशिंगी या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. या भेटीत त्या त्या गावात असणाऱ्या अडीअडचणी, प्रश्न कृषी विभाग, पंचायत समिती, पेन्शन योजना, बचत गट, तालुक्यातील नादुरुस्त रस्ते, बंधारे, शैक्षणिक, आरोग्य अशा अनेक प्रश्नांवर नागरिकांशी चर्चा करून रोखठोक अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. हा गाव भेट दौरा पुढे संपूर्ण तालुकाभर चालू राहणार असून, या दौऱ्याच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या अडचणी त्यांचे प्रश्न सुटणार आहेत. यामुळेच जयमालाताई गायकवाड यांनी हा दौरा सांगोला तालुक्यामध्ये घेतला आहे.

जयमाताई यांच्या या दौऱ्यामध्ये पहिल्या दिवशी झालेल्या गाव भेट दौऱ्यामध्ये विशेषत: बचत गटातील महिलांशी अनेक उद्योग धंद्यावर चर्चा होऊन, महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजना राबवता येतील यासाठी आपण प्रयत्नशील आहे व राहणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.

याचबरोबर नागरिकांच्या असणाऱ्या अडचणी सुद्धा लवकरच अधिकाऱ्यांशी व माजी आम. दीपकआबा साळुंखे-पाटील व शहाजी बापू पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण करून सर्वसामान्य जनतेला न्याय देऊन समाजसेवेचे वृत्त हे साळुंखे-पाटील कुटुंबाकडून अविरतपणे चालू राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या गावभेट दौऱ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.