Breaking News

 

 

आता भारताला जागतिक बाजारपेठेत सुवर्णसंधी…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या संरक्षण सामग्री निर्यातीत दुपटीने वाढ झाली आहे. ती आता ११ हजार कोटींच्या जवळ येवून पोहोचली आहे. देशांतर्गत कंपन्यांच्या अधिक ऑफसेट प्रोजेक्ट्समुळे अमेरिकेतील बाजारपेठेत संरक्षण सामग्री निर्यात दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे भारताला जागतिक बाजारपेठेत अधिक संधी मिळणार आहे.

२०१७ – १८ मध्ये भारताची संरक्षण सामग्री निर्यात ४ हजार ६८२ कोटी रूपये होती. २०१८-१९ मध्ये वाढून ती १० हजार ७४५  कोटी रूपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, भारतीय कंपन्यांना ठराविक देशांना संरक्षण सामग्रीची निर्यात करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक नवा जनरल एक्सपोर्ट लायसन्स प्लान तयार केला आहे. भारताच्या संरक्षण सामग्री निर्यातीत सर्वात मोठा वाटा अमेरिकेचा आहे. अमेरिकेत ५ हजार कोटी रूपयांच्या संरक्षण सामग्रीची निर्यात केली जाते.

अमेरिकेनंतर भारत इस्त्रायल आणि युरोपियन युनियनला सर्वाधिक संरक्षण सामग्री निर्यात करतो. काही धोरणांमध्ये बदल केल्यानंतर संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत मोठी वाढ झाल्याची माहिती काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

372 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा