Breaking News

 

 

कोल्हापुरच्या रवि शिंदे फुटबॉल संघांने पटकावला मुरगूड फुटबॉल चषक…

मुरगूड (प्रतिनिधी) :  हुतात्मा तुकाराम चौक यांच्यावतीने घेण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या रवी शिंदे फुटबॉल संघाने पेनल्टी शुटआऊटवर जय गणेशचा ४-३ अशा गोल फरकाने पराभव करीत अजिक्यंपद पटकावले. मॅन ऑफ द टुर्नामेंटचा मान आदित्य रोटे याने मिळविला. या स्पर्धेत दहा संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक किशोर खाडे यांच्या हस्ते व रणजित सुर्यवंशी, राजू आमते यांच्या उपस्थितीत झाले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक -रवी शिंदे फुटबॉल संघ, कोल्हापूर, द्वितीय क्रमांक -जय गणेश, गडहिंग्लज, तृतीय क्रमांक (विभागून) लाल आखाडा, मुरगूड व युनायटेड, गडहिंग्लज अशी आहेत. तर मॅन ऑफ द टुर्नामेंट – आदित्य रोटे (जय गणेश), बेस्ट गोलकीपर- निखील खाडे (शिंदे फुटबॉल), बेस्ट स्ट्रायकर -अक्षय होडगे (जय गणेश), बेस्ट मिडफिल्डर- ऋतुराज पाटील (लाल आखाडा), बेस्ट डिफेन्डर -आरबाज पेंढारी (शिंदे फुटबॉल) यांना देण्यात आले. रेफ्ररी म्हणून अनिल शिकलगार, प्रकाश लोहार, ओंकार रामाणे, सुयश राउत यांनी काम पाहिले

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ समरजित मंडलिक, अमर पवार, शुभम भोईटे, विक्रम पवार,रविंद्र पाटील, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सुखदेव पाटील, सत्यजित  पाटील, दिग्वीजय पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी दत्तात्रय मंडलिक, नगरसेवक राहूल वंडकर, नगरसेवक मारूती कांबळे, रणजित सुर्यवंशी, नामदेव भांदिगरे, राजू चव्हाण,जगन्नाथ पुजारी, श्रीनिवास पाटील, अमर देवळे, राजू आमते, संजय मोरबाळे, आदि उपस्थित होते.            

312 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा