पंढरपूर प्रतीनिधी

सौ. सुनेत्राताई पवार यांच्या कुशल नेतृत्वात “समाज परिवर्तनासाठी स्त्री शिक्षण” या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेल्या श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर शाळेत क्रीडा सप्ताहाचे उदघाटन पंढरपुरातील प्रसिद्ध कर सल्लागार श्री विश्वंभर पाटील  यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

पाहुण्यांचे स्वागत प्र. मुख्याध्यापक श्री संतोष कवडे यांनी केले. खेळ साहित्य व खेळ मैदानाची पूजन करून सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना श्री विश्वंभर पाटील म्हणाले, “जीवनात खेळाचे स्थान महत्त्वाचा आहे. आपण आयुष्यभर कोणता तरी आवडीचा खेळ खेळत राहिला पाहिजे. खेळ आपल्याला आयुष्यातील चढ-उतार झेलायला शिकवतात”. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचं साहित्य भेट म्हणून देण्याचे जाहीर केले.

क्रीडा सप्ताहात कबड्डी, लंगडी, धावणे, गोळाफेक, दोरी उड्या तसेच हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व या बौद्धिक स्पर्धा होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या क्रीडा सप्ताहाच्या सामना इयत्ता सातवी विरुद्ध सहावी कबड्डी घेण्यात आला. चुरशीच्या सामन्यामध्ये इयत्ता सातवीच्या मुलींनी सहावीच्या मुलींचा चार गुणांनी पराभव केला. सामन्याचे पंच म्हणून श्री महेश भोसले, श्री अशपाक मुजावर, श्री दिनेश आगवणे, श्री सोमनाथ साळुंखे यांनी केले. यावेळी सौ जयश्री खडतरे, वैशाली कदम, सुवर्णा जगदाळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आलनदीप टापरे यांनी केले.