Breaking News

 

 

साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आयुक्तांचे आदेश…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी आज (सोमवार) दिले. महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर साथींच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सर्व वैद्यकिय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

यावेळी आयुक्तांनी शहरामध्ये सध्या डेंग्यूच्या साथीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबिवण्यासाठी वैदयकिय अधिकारी, कुंटूंब कल्याण केंद्र व आरोग्य स्वच्छता विभागाकडील कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथकाची स्थापना करावी. शहरातील संवेदनशील भागांमध्ये दैनंदिन साथीच्या आजाराचे सर्व्हेक्षण करावे. या सर्व्हेक्षणासाठी स्थानिक नगरसेवक, सामाजिक संस्था, तरुण मंडळे, अशासकिय संस्थांचा सहभाग घेण्याबाबत निर्देशही दिले. तसेच घरामध्ये डेंग्यू डास अळी आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

तर भागातील अनावश्यक साहित्य ज्यामध्ये पाणी साचून डासोत्पत्ती होईल असे साहित्य गोळा करावे, अशी सुचना मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील यांना दिल्या. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्या उद्यानांमध्ये वैदयकिय अधिकाऱ्यांनी लोकांचे प्रबोधन करावे. तसेच आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध राहील याची काळजी घेण्याची सुचना आयुक्तांनी दिली. 

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ.अमोल माने, मुख्य उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस.के.माने, आर.के.जाधव, हर्षजित घाटगे, साथरोग अधिकारी डॉ.रमेश जाधव, कुंटूब कल्याण केंद्राकडील वैदयकिय अधिकारी उपस्थित होते. 

327 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा