एटीएम कार्ड ची आदलाबदल करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोन जणांना अटक

पंढरपूर प्रतिनिधी –

लोकांना बोलण्यात गुंतवत एटीएम कार्डचे अदलाबदल करून त्या एटीएम कार्ड मधून लोकांचे पैसे काढण्याचा प्रकार करणारे दोन ज णांना पंढरपूर शहर पोलिसांनी आज रोजी अटक केली.

ठाणे शहर आयुक्तालय येथील पोलीस अधिकाऱ्यांनी एटीएम कार्डची अदलाबदल करून ग्राहकांच्या खात्यातील पैसे काढणारी टोळी ही पंढरपूर शहर परिसरात असल्याचे समजल्यामुळे तांत्रिक बाबीच्या आधारे हे गुन्हेगार पंढरपूर शहर परिसरात असल्याचे ठाणे शहर आयुक्तालय मधील पोलिसांना कळाले त्यानुसार पंढरपूर शहरातील पोलिसांना तशी माहिती देऊन या एटीएम कार्डच्या अदलाबद्दीच्या माध्यमातून लोकांचे एटीएम कार्ड मधून पैसे काढणारे दोन जणांना आज पंढरपूर शहर पोलिसांनी चित्रपटामध्ये शोभेल अशा पद्धतीने या दोन एटीएम मधील पैसे चोरणाऱ्या सनी उर्फ चिकण्या मुन्ना सिंग तसेच श्रीकांत गोडबोले राहणार उल्हासनगर या दोघांना पंढरपूर शहर पोलीसांनी ताब्यात घेतले.

या दोघांच्या जवळून एकूण 101 एटीएम कार्ड मिळून आले या दोघा आरोपींनी महाराष्ट्रातील पुणे नाशिक सोलापूर ठाणे महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यामधून लोकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्या एटीएम कार्डच्या द्वारे असंख्य लोकांची फसवणूक केल्याची आढळून आले.

याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रमुख फुगे साहेब व तसेच त्यांचे सहकारी हे तपास करीत आहेत.