सुळेवाडी घाटात वनविभागाच्या झाडाला युवकाची गळफास घेऊन आत्महत्या 

माळशिरस लाइव्ह मराठी 

माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी घाटातील वनविभागाच्या हद्दीत मासाळवाडी तालुका माण जिल्हा सातारा येथील युवक सुरेश जालींदर नरुटे वय २१ याने ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बारातोंडीच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खबर मयताचे वडील जालींदर नरुटे यांनी पिलीव पोलीस ठाण्यात दिली आहे.

” आत्महत्येचे कारण निश्चित समजले नसले तरी त्याठिकाणी सदरची आत्महत्या प्रेम प्रकरणातुन पण मुलीच्या आई वडील व मुलीनेही लग्नास नकार दिल्याच्या नैराशयतुन सदर युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते तसे खाजगीत बोलले जात होते.”

पिलीव पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार अभिजीत कणसे,पंडीत मिसाळ,हवालदार सतीश धुमाळ, अमीत जाधव, यांनी पोलीस निरीक्षक दिपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जाऊन नातेवाइकांच्या समक्ष पंचनामा करुन मृतदेह माळशिरस येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर रात्री मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.सदर युवकाने केलेल्या आत्महत्येचे कारण निश्चित समजु शकले नाही. सदर घटनेचा अधिक तपास ठाणे हवालदार अभिजित कणसे हे करीत आहेत.