Breaking News

 

 

पुन्हा पुलवामात दहशतवादी हल्ला होऊ शकतो ; पाकिस्तानचे वक्तव्य

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्हयातील अवंतीपोरा येथे दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी खळबळजनक माहिती पाकिस्तानने इस्लामाबाद येथील भारताच्या उच्चायुक्तांना दिली आहे. कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा याच्या मृत्यूचा सूड म्हणून दहशतवाद्यांनी हल्ल्याची ही योजना आखल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. श्रीनगर येथे माध्यमाशी बोलताना ज्येष्ठ अधिकाऱ्यांने याबद्दल माहिती दिली.

पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याची सूचना दिल्यानंतर काश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे. दहशतवादी कोणत्याही वाहनावर स्फोटक लावून विस्फोट घडवू शकतात अशी माहिती पाकिस्तानबरोबरच अमेरिकेने दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, किर्गीस्तान येथील बिश्केक एससीओ समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनफिंग यांना सांगितले होते की, ‘पाकिस्तानशी चर्चा करण्याआधी त्यांनी दहशतवादमुक्त वातावरण तयार करावयास हवे. कारण आतापर्यंत प्रत्येकवेळी पाकिस्तानबरोबर केलेली चर्चा निष्फळ ठरली आहे. असेही मोदींनी बोलताना म्हटले होते. तेव्हापासून पाकिस्तान अस्वस्थ आहे. आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

420 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा