‘परमेश्वर’ या अदृश्य शक्तीवर गाढ श्रद्धा असते या श्रद्धेतूनच माणूस नीती -अनीतीच्या संकल्पनांमुळे सत्कार्याकडे वळतो, म्हणूनच आमदार झाल्यापासून कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघात विविध धर्मांची सातशे प्रार्थना स्थळे उभारण्याचं भाग्य मिळालं असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ते सुरूपली येथे विकासकामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

पुढे बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले की, कागल विधानसभा मतदार संघातील जनतेच्या पाठबळामुळे मी सलग पाच वेळा आमदार झालो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले नसते तर वीस वर्षाच्या मंत्री पदाचा टप्पा पूर्ण केला असता. आमची सत्ता जरी नसली तरी कागल विधानसभा मतदार संघात विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.

कागल तालुक्यात दौलतराव निकम, शामराव भिवाजी पाटील, स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी विकास कामात कधीही अडथळा आणला नाही. सध्या मात्र काही मंडळी विकास कामात अडथळा आणत विरोधासाठी विरोध म्हणून राजकारण करीत आहेत. अशा प्रवृत्तींना कागलच्या जनतेने थारा देऊ नये असे ही ते म्हणाले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले आमदार श्री. मुश्रीफ यांनी नुकत्यात नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात अलमट्टी धरणाची उंची कमी करण्यासाठी सभागृहात लक्षवेधी प्रश्न मांडल्याचे नमुद केलं. यावेळी दिग्विजय पाटील, बाळासो मोरे, विलास पाटील, विजय भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सरपंच अनिल कांबळे यांनी केले. प्रास्ताविक के. डी. सी. बँक इन्स्पेक्टर दगडू हरेल यांनी केले. आभार गणपती घाटगे यांनी मानले.

कार्यक्रमासाठी के. डी. सी. सी. बँकेचे संचालक भैया माने, दिग्विजय पाटील , कागल पंचायत समितीचे माजी सभापती विजय भोसले, शेतकरी संघांचे प्रशासक जयवंत पाटील, प्रा. डी. डी चौगुले,आदींसह गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.