यंदाच्या हंगामातील पहिला देवगड हापूस आंबा कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती दाखल झाला आहे. या आंब्याला सर्वाधिक भाव मिळाला असून कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सर्वाधिक बोली लावत तो खरेदी केला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज कोल्हापुरात यंदाच्या हंगामातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिला देवगड हापूस दाखल झाला आहे.या हंगामातील पहिल्या हापूसचा लिलाव पार पडला, याची सर्वाधिक बोली लावत खासदार धनंजय महाडिकांनी पाच डझनांची पेटी खरेदी केली असून लिलावाची सुरुवात दमदार झाल्याने विक्रेत्यांमध्ये ही उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी बाजार समितीचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

विक्रमी भाव देवगडचे सुहास गोवेकर यांच्या हापूसला मिळाला आहे. मात्र सध्या हापूस इतर आंब्यांच्या तुलनेत अधिक महाग असल्याने ग्राहकांनी देवगड हापूसच्या खरेदीला प्राधान्य देत असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे देवगड हापूस आंब्याला या महिन्यात मुबलक मोहोर आल्याची चित्र आहे. त्यामुळे हळूहळू आंब्यांची आवक बाजारपेठेत वाढेल त्यानुसार आंब्याचे दर कमी होत जातील. अन् सामान्यांना ही याची खरेदी करता येणार आहे.