Breaking News

 

 

पाककडून माओवादी – नक्षलवाद्यांना रसद ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरात दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाककडून आता माओवादी-नक्षलवाद्यांनाही रसद पुरविली जात असल्याचा संशय आहे. छत्तीसगडमध्ये कांकेर येथे चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडे जप्त केलेल्या रायफल्स या पाकिस्तानी बनावटीच्या आढळल्या आहेत.

कांकेरमधील तडोकी येथे सुरक्षा दलाचे जवान गस्तीवर होते. यावेळी नक्षलवाद्यांसोबत चकमक झडली. दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यावेळी ठार केलेल्या नक्षलवाद्यांकडून एसएलआर रायफल, एक ३०३ रायफल, एक १२ बोर रायफल, काडतुसे आणि इतर साहित्य जप्त केले. या रायफल्स पाकिस्तानी बनावटीच्या आहेत.

पाक लष्कर ते वापरते. पाक लष्कराकडून थेट नक्षलवाद्यांना शस्त्र्ा पुरवठा होतो की, दहशतवाद्यांकडून दिला जातो ? याचा तपास सुरू आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांने सांगितले आहे.

114 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा