Breaking News

 

 

२०१९ ची ‘ही’ ठरली ‘मिस इंडिया’

मुंबई (प्रतिनिधी) :  फेमिना मिस इंडिया २०१९ चा निकाल लागला. राजस्थानच्या सुमन रावने हा किताब जिंकला. २२ वर्षीय सुमनने अनुकृती वासनंतर तिने हा किताब जिंकला. सरदार वल्लभ भाई पटेल स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत हुमा कुरेशी, चित्रंगदा सिंग, रेमो डिसूजा, विकी कौशल आणि आयुष शर्मा, मिस वर्ल्ड २०१८ वेनेसा पोंसे, शहाने पिकॉक, मुकेश छाबरा हे सेलिब्रिटी उपस्थित होते.

सुमन सध्या चार्टड अकाउंटची तयारी करत आहे. सुमनने हा किताब जिंकून आप स्वप्न सत्यात उतरवलं आहे. यावेळी सुमन म्हणाली की, तिच्यात आयुष्यात त्या सर्व गोष्टी करायचीही हिंमत आहे. ज्यांना लोक अशक्य मानतात. आपल्या आई- वडिलांकडून ती खूप शिकल्याचे तिने सांगितले. मिस इंडिया २०१९ चा किताब जिंकणं हे तिच्यासाठी फार मोठी संधी आहे.

फेमिना मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर आता सुमन मिस वर्ल्ड स्पर्धेत जाणार आहे. सुमन या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. सुमनशिवाय इतर स्पर्धकांची नावंही चर्चेत होती. तेलंगनाच्या संजना विज उपविजेती ठरली. तर बिहारच्या श्रेया शंकरने मिस इंडिया यूनायटेड कॉन्टिनेंट २०१९ चा किताब जिंकला. छत्तीसगढच्या शिवानी जाधवने मिस ग्रँड इंडिया २०१९ चा किताब जिंकला. या स्पर्धेत एकूण ३० स्पर्धक होत्या.

1,344 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा