कोल्हापूर शहरातील काही उपनगरात दैनंदिन पाणीपुरवठा होणार नाही. मंगळवारी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. त्यामुळे सलग चार दिवस कोल्हापुरात पाण्याचे संकट असणार आहे. मुख्य जल वाहीनीला गळती लागली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती जलविभागाने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हरीओम नगरकडे जाणाऱ्या मुख्य जल वाहीनीला गळती लागल्याने दुरुस्तीसाठी उद्या शनिवारी शहरातील ए व बी वॉर्ड तसेच संलग्न उपनगरांमध्ये दैनंदिन पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सुद्धा अपुरा व कमी दाबाने होईल. त्यामुळे सलग चार दिवस कोल्हापुरात पाण्याचे संकट असणार आहे.

पाण्याचा पुररवठा कमी होणारे क्षेत्र पुढील प्रमाणे

ए, बी, वॉर्ड त्यास संलग्न उपनगरे, लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी व फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरूजी, राजे संभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर, मिरजकर तिकटी, भारत डेअरी परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ काही भाग, त्याप्रमाणे सी डी वॉर्डमधील दुधाळी,

गंगावेश, उत्तरेश्वरपेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवारपेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर, दसरा चौक, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, रविवार पेठ, उमा टॉकीज परिसर, गुजरी, देवलक्लब तसेच ई वॉर्ड मधील खानविलकर पेट्रोलपंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी परिसरात होणारा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

सोमवारी काही भागात पाणी पुरवठा बंद

शिंगणापूर अशुध्द उपसा केंद्राकडील 1100 मी.मी. मुख्य वितरण नलिकेवर गळती लागली आहे. ही गळती सोमवारी काढण्यात येणार आहे. शिंगणापूर उपसा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागामध्ये सोमवारी होणारा दैनंदिन पाणीपुरवठा होणार नाही.

मंगळवारी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. या कालावधीत दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या उपलब्ध टँकरने पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलं आहे.

यामध्ये संयुक्त महाराष्ट्र सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन परिसर, ग्रीनपार्क परिसर, गोळीबार मैदान, उलपे मळा, रमणमळा, केव्हीज पार्क, नागाळ पार्क, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, महाडिक वसाहत, लिशा हॉटेल, मार्केट यार्ड, कावळा नाका, स्टेशन रोड, शाहूपुरी 1 ली ते 4 थी गल्ली, व्यापार पेठ इत्यादी भागातील नागरिकांना दैनंदिन होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.