पंढरपूर प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने तीन व चार जानेवारी रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्री अजयसिंह पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री सुनील खमीतकर हे होते.

या कार्यक्रमास  वैशाखा सच्चिदानंद बांगर साहेब सहाय्यक सल्लागार शशी ढेकळे श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ मंगळवेढा चे सचिव श्री चित्रसेन पाथरूट, एन ए बी सोलापूरचे शशी भूषण यगुलवार यांच्यासह इतर संस्थेचे मान्यवर उपस्थित होते.

चार जानेवारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा ओहाळ  व बक्षीस वितरणासाठी सोलापूरचे असिस्टंट कमिशनर पोलीस विजय कबाडे साहेब उपस्थित होते.

३ व ४ झालेल्या स्पर्धेमध्ये श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ मंगळवेढा या संस्थेच्या पाचही शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले यामध्ये आठ सुवर्णपदके, बारा रौप्य व दहा कांस्यपदकासह एकूण 30 पदकांची कमाई केली. तर श्री नागनाथ मूकबधिर निवासी विद्यालय बाभूळगाव ता. पंढरपूर शाळेने जिल्हास्तरीय जनरल चॅम्पियनशिप मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.

या जिल्हास्तरीयस झालेल्या स्पर्धेमधून संस्थेच्या आठ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली यामध्ये नागनाथ मूकबधिर विद्यालय बाबुळगाव तालुका पंढरपूर या शाळेचे विद्यार्थी विठ्ठल भोरे, सागर गोरे, रंणजीत शिंदे, पूजा काळेबाग तसेच श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर विद्यालय करमाळा येथील विद्यार्थी निहाल शेख, श्रेया जगताप ,पुनम पोडमल व करुणा मतिमंद निवासी विद्यालय मंगळवेढा येथील विद्यार्थी गायत्री चिखली या आठ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

तसेच 4 जानेवारी रोजी झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये श्री नागनाथ मतिमंद निवासी विद्यालय केम तालुका करमाळा या शाळेने चंद्रभागेच्या तिरी हे गीत सादर करून दुसरा क्रमांक मिळवला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षकांचे संस्थेच्या वतीने सचिव चित्रसेन पाथरुट व अध्यक्ष सुशीला पाथरूट यांनी अभिनंदन केले तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.