Breaking News

 

 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तातडीने दाखले द्या : शिवसेनेची मागणी

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तातडीने दाखले द्यावेत अशी मागणी शिवसेनेने केली आहे. आज (शनिवार) गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी कार्यालयाकडे  याबाबतचे निवेदन देण्यात आले.  

निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने झाली. त्याची दखल घेत शासनाने दाखले देणेबाबत निर्देश दिले. पण प्रशासकीय कर्मचारी प्रत्यक्षात अडवणूक करतात. त्यामुळे दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागतात अशी पालक, विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत विद्यार्थ्यांना तत्काळ दाखले मिळतील याची सोय करावी. जेणेकरून आंदोलन करण्याची वेळ येणार नाही.

या वेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख  प्रा. सुनील शिंत्रे, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीपराव माने, शहरप्रमुख सागर कुराडे, अशोक शिंदे,  उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, अवधूत पाटील, मल्लिकार्जुन चौगुले, बाबूराव नाईक,  काशीनाथ गडकरी, हालापा भमानगोळ, चंद्रकांत पोवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा