कुरुंदवाड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा  परिषद पुणे यांच्यामार्फत जुलै महिन्यात इयत्ता आठवी साठी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ग्रामीण विभागात अकिवाट ता. शिरोळ येथील विद्यासागर हायस्कूलची विद्यार्थिनी कु. अनुष्का विद्यासागर उळागड्डे हिने राज्यात १० वा क्रमांक पटकावला आहे.

तसेच नेहा विठ्ठल पाटील, व सृष्टी शिवकुमार पाटील यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत क्रमांक पटकावला. इ.५ वी साठीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत  सर्वेश अनिल कुन्नुरे, राजनंदिनी संजय पाटील, स्नेहा अमर पाटील, देवेंद्र संजय पाटील, शुभम विजय पाटील या विद्यार्थ्यांनी जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत क्रमांक पटकावला.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे अध्यापक  ए. ए. मुल्ला, डी. एस.सरडे,  जे. आर. चावरे, जे.ए.कल्याणी, एस.ए.नरखडे, ए.व्ही चौगुले विभाग प्रमुख जे. एस. गिताजे,व ए.एम.करडे यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक डी.बी. वाडकर, चेअरमन कमलाकर चौगुले, पालक विद्यासागर उळागड्डे यांचे प्रोत्साहन लाभले.