Breaking News

 

 

जिल्ह्यातील उपसाबंदी शिथिल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तापमानात वाढ झाल्यामुळे राधानगरी, तुळशी व दूधगंगा या मोठ्या व कुंभी, कासारी व कडवी या मध्यम प्रकल्पातील पाणी पावसाळा सुरु होईपर्यंत पुरविणे आवश्यक आहे. त्यामुळे भोगावती व पंचगंगा नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागासाठी उन्हाळी हंगाम २०१८-१९ साठी उपसाबंदी लागू करण्यात आली होती.

प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा व मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात झाल्यामुळे नद्यांमधील उपलब्ध पाणी उपसा करण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आल्यामुळे सदर भागातील उपसाबंदी गुरुवार दि. १३ जून २०१९ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून शिथिल करण्यात आली आहे, असे कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

528 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा