Breaking News

 

 

डॉक्टरांना मारहाणीच्या निषेधार्थ गडहिंग्लजमधील दवाखाने सोमवारी राहणार बंद

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोलकाता येथील परिभा मुखर्जी आणि यश टकवानी या दोन डॉक्टरांना हॉस्पिटलमधील आलेल्या मयताच्या नातेवाइकांनी मारहाण केली होती. या प्रकारच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांनी आज (शुक्रवार) दिवसभर काम बंद आंदोलन केले. गडहिंग्लज येथेही आज इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे बाह्य रुग्ण सेवा (ओपीडी) बंद ठेवण्यात आली. तसेच प्रांताना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या प्रकारच्या निषेधार्थ सोमवार दि. १७ रोजी गडहिंग्लजमधील सर्व दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी डॉ. उत्तम इंगवले, डॉ. गजानन गलगले, राजेश पट्टणशेट्टी, पी. डी. कल्याणशेट्टी, सीमा पाठणे,  एम. एस. बेळगुद्री, डॉ. विनय माने आदी उपस्थित होते.

3,375 total views, 21 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा