Breaking News

 

 

कोल्हापूर शहरात ‘या’ दिवशी येणार नाही पाणी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  बालिंगा ते चंबुखडी या दरम्यानच्या मुख्य वितरण नलिकेस गळती लागली आहे. ही गळती काढण्याचे काम सोमवारी केले जाणार असल्याने मंगळवार (दि.१८) शहरातील बहुतांशी भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या पत्रकात म्हटले आहे.

मंगळवारी संपूर्ण सी व डी वॉर्ड त्याला संलग्नित असणारी उपनगरे, ग्रामिण भाग तसेच ए वॉर्डमधील फुलेवाडी, रिंगरोड, लक्षतिर्थ, नाना पाटीलनगर, आपटेनगर, साने गुरुजी, तुळजा भवानी, तलवार चौक, हरीओम नगर, जुना वाशीनाका, शिवाजी पेठ, सरनाईक कॉलीनी, जावळाचा गणपती, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, महालक्ष्मी मंदिर, जुना बुधवार तालीम या भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. या कालावधीत पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवले जाणार आहे. उपलब्ध असणारे पाणी काटकसरीने वापरावे, असे आवानही जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी केले आहे.

327 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा