Breaking News

 

 

टोपमध्ये पेट्रोलपंपावर मोटरसायकलने घेतला अचानक पेट अन्…

टोप (प्रतिनिधी) : टोप (ता. हातकणंगले) येथे राष्ट्रीय महामार्गालगत  असलेल्या शेतीमाल प्रक्रिया संघाचा  पेट्रोल पंप आहे. यावेळी  पानपट्टी दुकानासमोर सुनिल पोवार (रा. टोप) हे आपली मोटारसायकल  सुरु करीत होते. पण अचानक या मोटारसायकलने पेट घेतला. यामध्ये मोटारसायकल पूर्ण जळून खाक झाली. येथे असणाऱ्या उपस्थित लोकांनी ही आग विझवली. ही घटना आज (शुक्रवार) घडली.

सुनिल पोवार हे आपली मोटारसायकल  स्टार्ट  होत नव्हती म्हणून या  गाडीचे  स्टार्टरचे बटन दाबून मोटारसायकल  स्टार्ट  करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यातच या  गाडीचे पेट्रोलचा ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून पेट्रोल सांडले होते. गाडी सुरु करीत असताना अचानकपणे या गाडीचा  प्लग शॉर्ट झाल्याने  मोटारसायकलने  अचानक  पेट घेतला.  घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरीकांनी प्रसंगावधान राखत  पेट्रोल पंपावरील आपत्कालीन अग्निशमन यंत्र  तसेच  पाणी ओतून ही  आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

ही आग वेळीच आटोक्यात आल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. अन्यथा काही अंतरावरच पेट्रोल पंप असल्याने मोठा अनर्थ घडला असता. या गाडीचे अंदाजे १७ ते १८ हजाराचे नुकसान झाले आहे.

1,530 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग