Breaking News

 

 

मुथुटवर दरोड्याचा प्रयत्न गोळीबारात एकाचा मृत्यू…

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील उंटवाडीत परिसरात मुथुट फायनान्सवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

मृत कर्मचारी हा मुथुट फायनान्सच्या मुख्य कार्यालयातील लेखा परिक्षक  असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या शरीरात सहा गोळ्या आढळल्या आहेत. भोंगा वाजल्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार केला. घटनास्थळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी भेट देऊन तपासासंबंधी सुचना दिल्या.

उंटवाडीत सिटी सेंटर मॉलनजीकच्या मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्यांनी गोळीबार केला. एकजण ठार तर वॉचमनसह तीन जण जखमी झाले आहेत. गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. दरोडेखोरांकडे रिव्हॉल्वर व पिस्तूल होते. त्यांच्यामध्ये येणाऱ्यांवर त्यांनी  गोळीबार केला. नाशिकमध्ये दिवसेंदिवस चोरी, दरोड्यासह गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

552 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग