Breaking News

 

 

धनंजय मुंडे यांच्यावरील कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने दिलासा स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर आज (शुक्रवार) पहाटे दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती मिळाली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथे नियोजित जगमित्र शुगर मिल साठी चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर जमीन ही देवस्थानची असल्याचा दावा वादीतर्फे करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता.

या आदेशाविरुद्ध धनंजय मुंडे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज या प्रकरणावर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्याच बरोबर आज सकाळी दाखल झालेल्या गुन्ह्याही आता स्थगिती मिळाली आहे. या निर्णयाचे धनंजय मुंडे यांनी स्वागत केले असून सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

414 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग