Breaking News

 

 

सांगली जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांंना मारहाण करीत २५ लाखांची लूट :

सांगली (प्रतिनिधी) : तासगाव – विसापूर रस्त्यावर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करीत चौघा चोरट्यांनी २५ लाखांची रोकड लुटली. हा प्रकार आज (शुक्रवार) दुपारी १२ च्या सुमारास घडला. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेचे दोन कर्मचारी दुचाकीवरून तासगाव येथील बाजार समितीच्या आवारातील शाखेत पैसे नेण्यासाठी आले होते. कर्मचाऱ्यांनी या शाखेतून २५ लाखांची रोकड घेतली. ही रक्कम बॅगमध्ये घेऊन ते विसापूरकडे निघाले.  त्यांच्या पाळतीवर असलेल्या चोरट्यांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. तासगाव – विसापूर रस्त्यावर कॅनॉलजवळ या दोघांना अडवून त्यांच्या डोळ्यात चटणी फेकली. त्यांना बेदम करीत त्यांच्या हातातील २५ लाख रुपये रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. यानंतर चोरटे ढवळीच्या दिशेने पसार झाले.

या घटनेची वाऱ्यासारखी बातमी तालुक्यात पसरली. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ठिठिकाणी नाकाबंदी केली आहे. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम तासगावात दाखल झाली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

1,395 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा