मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. बाजारात आज दिवसभरातील व्यवहारात खरेदी-विक्री दरम्यान जोर दिसून येत होता. त्यामुळे बाजारात अस्थिरता दिसून आली होती. मात्र, बाजारातील व्यवहार तेजीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १२६ अंकांच्या तेजीसह ६१,२९४ अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३७ अंकांच्या तेजीसह १८,२३४ अंकांवर बंद झाला. 

शेअर बाजारात आज व्यवहार झालेल्या कंपन्यांपैकी ११९८ कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर,१४२३ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. १३० कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ इन्सुरन्स, अॅक्सिस बँक, टायटन कंपनी, टीसीएसच्या शेअर दरात तेजी दिसून आली.