जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर करणार उद्घाटन

पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम

लाईव्ह मराठी /करमाळा

करमाळा पत्रकार संघाच्या वतीने शनिवार दिनांक 7 जानेवारीला एक दिवशीय पत्रकारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे करणार आहेत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयबीएन लोकमतचे अँकर विलास बडे उपस्थित राहणार आहेत.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेत डॉक्टर प्राध्यापक महेंद्र कदम ग्रामीण पत्रकारांपुढील आव्हाने तर डॉक्टर प्राध्यापक प्रदीप मोहिते आमच्या समाजाच्या पत्रकारांकडून अपेक्षा या विषयावर भाष्य करणार आहेत.

साम टीव्ही चे माजी संपादक राजेंद्र हुजे पत्रकारांची सामाजिक जबाबदारी व्याख्यान देणार आहेत.
विधीज्ञ बाबुराव हिरडे सोशल मीडिया चे पत्रकारितल महत्व' या विषयावर बोलणार आहेत मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे `पत्रकारितेच्या माध्यमातून रुग्णसेवा’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून आयबीएन ची टीव्ही अँकर विलास बडे पत्रकार करिअर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या पत्रकारांच्या कार्यशाळेसाठी करमाळा, माढा, जामखेड, कर्जत या भागातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आव्हान करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांनी केले आहे.

ज्या तरुण-तरुणींना पत्रकारितेमध्ये करिअर करायचे आहे अशा विद्यार्थ्यांनीही या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आव्हान करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे