Breaking News

 

 

#MeToo : अभिनेते नाना पाटेकर यांना मोठा दिलासा…

मुंबई (प्रतिनिधी) :  अभिनेते नाना पाटेकर यांना मी टू प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नानांवर गैरवर्तणुकीचे आरोप लावले होते. पण, या प्रकरणात कोणताही पुरावा नसल्याची बाब पुढे आली आहे. परिणामी या गुन्ह्यात तथ्य नसल्याचा अहवाल पोलिसांनी अंधेरी न्यायालयात सादर केला आहे.  

न्यायालयाकडून पोलिसांतर्फे सादर करण्यात आलेल्या या अहवालाची तपासणी होऊन त्यानंतर या प्रकरणीचा अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. या अहवालात प्रकरणात पोलिसांनी पुराव्याअभावी एक खोटा खटला दाखल केल्याचे म्हटले आहे. हा अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाकडून तनुश्रीला एक संधी देण्यात येणार आहे. ज्यावर तिचंही मत विचारात घेतलं जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय देण्यात येईल.

मुख्य म्हणजे न्यायालयाकडून आदेश मिळाले तर, याप्रकरणीचा तपास पुन्हाही केला जाऊ शकतो. पण, सध्याच्या घडीला नानांविरोधात कोणताही पुरावा मिळाला नसल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे नानांचा हा एक दिलासाच मिळाला आहे. 

585 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा