Breaking News

 

 

संरक्षक भिंत अंगावर कोसळून मुलगा गंभीर जखमी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी पार्क येथे संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने नकुल प्रकाश साळवे (वय ७) हा मुलगा गंभीर जखमी झाला. आज (गुरुवार) सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला ढिगाऱ्यातून बाहेर काढून उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले.

शिवाजी पार्क येथील हॉटेल केट्रीच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या संरक्षक भिंतीनजीक नकुल बसला होता. त्यावेळी अचानक ही संरक्षक भिंत त्याच्या अंगावर कोसळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून त्याला ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्याला अग्निशमन दलाच्या गाडीतूनच त्याला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अवघ्या पाच मिनिटात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. स्थानक अधिकारी कांता बांदेकर, चालक उमेश जगताप, फायरमन केरबा निकम, माणिक कुंभार, गणेश टिपूगडे, आकाश जाधव या जवानांनी नकुलला मातीच्या ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर काढून अग्निशमन दलाच्या गाडीतूनच त्याला सीपीआरमध्ये नेले. सध्या त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.

489 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा