Breaking News

 

 

अण्णा हजारे यांना राजर्षी शाहू पुरस्कार : जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : समाजकारण, प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस राजर्षी शाहू छत्रपती मेमोरीअल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा राजर्षी शाहू पुरस्कार जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत घोषणा केली.

अध्यक्ष दौलत देसाई म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी या आपल्या गावात ग्रामविकास आणि जलनियोजन करुन दुष्काळमुक्तीपासून समाजकार्याला अण्णा हजारे यांनी सुरुवात केली. त्यानंतर महात्मा गांधी यांचा सत्य आणि अंहिसा या मार्गाने उपोषणाचे हत्यार उगारत देशातील भ्रष्टाचार मुक्तीसाठी माहितीचा अधिकार, लोकपाल आणि लोकाआयुक्त कायदा यासाठी त्यांनी यशस्वी लढा दिला. यामुळे देशभर त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध सन्मानांनी गौरवण्यात आले. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरीअल ट्रस्टच्यावतीनेही देशातील मानाचा राजर्षी शाहू पुरस्कार देऊन अण्णा हजारे यांना २६ जून रोजी शाहू जयंतीच्या निमित्ताने सन्मानित करण्यात येणार आहे.

ट्रस्टचे सदस्य आणि निमंत्रीत यांच्या समितीने अण्णा हजारे यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. शाहू जयंतीनिमित्त ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजर्षी शाहू व्याख्यानमाला आयोजीत केली आहे. २१ जून पासून दररोज सायंकाळी सहा वाजता शाहू स्मारक भवनमध्ये ही व्याखानमाला होणार आहे. मुख्य शाहू पुरस्कार प्रदान सोहळा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी ट्रस्टचे सदस्य महापौर सरिता मोरे, आयुक्त एम. एस. कलशेट्टी, प्रा. जयसिंगराव पवार, डॉ. राणी ताटे उपस्थित होत्या.

276 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा