Breaking News

 

 

उद्यापासून कोल्हापुरात ‘फुटबॉल स्किल’चा थरार… : ‘लाईव्ह मराठी’तर्फे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  ‘लाईव्ह मराठी’तर्फे उद्या (गुरुवार) पासून आदित्य फुटबॉल स्किल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची फेरी १३ जून रोजी निवृत्ती चौक, १४ जून रोजी मिरजकर तिकटी आणि अंतिम फेरी शनिवार दि. १५ जून रोजी छ. शिवाजी चौक येथे होणार आहे. या स्पर्धेची वेळ सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत असणार आहे. या स्पर्धेसाठी आ. राजेश क्षीरसागर फौंडेशनचे प्रमुख सहकार्य तर संजीवन (पन्हाळा), चाटे शिक्षण समूह आणि मारुती सुझुकी साई सर्व्हिस यांचे सह-प्रायोजकत्व लाभले आहे.

कोल्हापूरकरांना फुटबॉल म्हणजे जीव की प्राण आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या ‘लाईव्ह मराठी’तर्फे पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अनोख्या अशा फुटबॉल स्किल स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. यामध्ये ‘केएसए’ मान्यताप्राप्त गटातील फुटबॉल संघांंनी उत्स्फूूर्त सहभाग नोंदवला आहे. यामध्ये थाईज् जगलिंग, अँकल जगलिंग आणि हेडींग जगलिंग या स्किलवर स्पर्धा होणार असून प्रत्येक संघाचे सहा खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारची पश्चिम महाराष्ट्रात ही पहिलीच स्पर्धा भरवली जात आहे. याविषयी कोल्हापूरच्या फुटबॉल प्रेमींमध्ये प्रचंड उत्कंठा लागून राहीली आहे. स्पर्धा शहरातील मुख्य तीन चौकात होणार असून सर्वांसाठी ही एक आगळीवेगळी मेजवानी ठरणार आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले संघ पुढीलप्रमाणे –

संध्यामठ तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळ (अ), खंडोबा तालीम मंडळ (ब), उत्तरेश्वर प्रासादिक तरुण मंडळ (वाघाची तालीम), प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, कोल्हापूर पोलीस संघ, संयुक्त जुना बुधवार पेठ, बीजीएम स्पोर्टस्, रंकाळा तालीम आणि सोल्जर स्पोर्ट्स हे नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

867 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे