Breaking News

 

 

करंबळीमध्ये अनाधिकृत पाणी उपसा करणाऱ्या चार शेतकऱ्यांवर कारवाई…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : करंबळी (ता.गडहिंग्लज) येथील अनाधिकृत पाणी उपसा करणाऱ्या चार शेतकऱ्यांवर पाटबंधारे विभागाने कारवाई केल्याचे शाखा अभियंता तुषार पवार यांनी आज (बुधवार) सांगितले.

करंबळी येथे पाटबंधारे विभागाने २१ मे पासून पाणी उपसा बंदी लागू केली होती. कालवा निरीक्षक पी.बी.पाटील हे करंबळी ल.पा.तलावावर उपसाबंदीची पाहणी करणे करीता गेले होते. त्यावेळी जोतीबा हरी गोडसे,बाजीराव आबा गवस, प्रकाश शंकर पाटील, सदाशिव आप्पा येसादे यांच्या शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत पंपाद्वारे अनाधिकृत पाणी उपसा करीत असल्याचे आढळून आले.

यावेळी पाटील यांनी पंचनामा करुन त्यांच्यावर २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत पंपाचा विद्युत परवाना रद्द करण्याचा अहवाल  उपविभागीय कार्यालायकडे पाठवला. यावेळी उपविभागीय कार्यालयाकडून त्यांच्यावर २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत पंपाचा विद्युत परवाना रद्द करण्याची कारवाई केल्याचे शाखा अभियंता तुषार पवार यांनी सांगितले.

3,009 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे