Breaking News

 

 

जहाली नक्षलवादी नर्मदाक्काला पोलीसांनी केले पतीसह जेरबंद…

नागपूर (प्रतिनिधी) : सरकारने ५० लाखांचे बक्षीस लावलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीची प्रमुख,  दंडकारण्य स्पेशल झोनल समितीची सदस्य व जहाल नक्षली नर्मदाक्का हिला तिचा पती किरणकुमार याच्यासह गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्याना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले की, गडचिरोली पोलीस मागील अनेक दिवसांपासून नर्मदाक्का व किरणकुमार यांचा शोध घेत होते. दोघेही तेलंगणा राज्यातून सिरोंचामार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. गडचिरोली पोलिसांनी तेलंगणा पोलिसांच्या सहकार्याने नर्मदाक्का व किरणकुमार यांना सिरोंचा बसस्थानकावरुन अटक केली आहे.

दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य असलेली नर्मदाक्का ही डीकेएएमएसची इन्चार्ज होती. एके-४७ हे शस्त्र वापरणारी नर्मदाक्काच्या नेतृत्वात जिल्ह्यातील बहुतांश नक्षली आजवर काम करीत होते. आजवर झालेल्या अनेक जाळपोळी व हत्यांची मास्टर माईंड नर्मदाक्का होती.

२००९ मध्ये हत्तीगोटा चकमक, २०१० मधील लाहेरी येथील चकमक, २०१६ मध्ये सुरजागड पहाडावर झालेली ८० वाहनांची जाळपोळ, जोगनगुडा येथील दोन शिक्षकांच्या हत्या अशा अनेक गुन्ह्यांत तिचा सहभाग होता. तिच्यावर जिल्ह्यात ६५ गुन्हे दाखल होते. राज्य शासनाने तिच्यावर सुमारे २५ लाखांचे बक्षीस ठेवले होते.

नर्मदाक्काचा पती किरणकुमार हादेखील दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य होता. तसेच दंडकारण्य पब्लिकेशन टीमचा इन्चार्ज होता. नक्षल्यांच्या ‘प्रभात’ या मासिकाचाही तो संपादक होता. तो ९ एमएम पिस्टल हे शस्त्र वापरायचा. त्याच्यावरही महाराष्ट्र शासनाचे २५ लाखांचे बक्षीस लावले होते.

या घटनेमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. आदिवासींनी स्वत: पुढे येऊन नक्षल्यांना गावबंदी करावी, असे आवाहन बलकवडे यांनी केले.

330 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे