Breaking News

 

 

‘नमामि पंचगंगा’ उपक्रम सुरुच ठेवणार : शौमिका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंचगंगा नदी पुर्णपणे स्वच्छ होईपर्यंत नमामि पंचगंगा हा उपक्रम सातत्याने सुरु ठेवणार असून यासाठी जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त होईल, असा विश्वास जि.प.अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी आज (बुधवार) व्यक्त केला. त्या नमामि पंचगंगा उपक्रमाच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात प्रयाग चिखली येथे बोलत होत्या.

जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक आणि करवीर दक्षिणचे आ. अमल महाडिक यांच्या पुढाकाराने गेल्यावर्षीपासून सुरु झालेल्या नमामि पंचगंगा या उपक्रमाच्या वर्षपूर्ती समारंभ प्रयाग चिखली येथे आज पंचगंगा नदीच्या काठी आज (बुधवार) सकाळी सात वाजल्यापासून सुरु झाला.

या उपक्रमात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे कर्मचारी तसेच प्रयाग चिखली परिसरातील नागरीकांनी सहभाग घेतला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी स्वच्छता मोहिमेला भेट देऊन स्वच्छता अभियानाबद्दल जनजागरण कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी शौमिका महाडिक म्हणाल्या की, हा उपक्रम सुरु झाला तेंव्हा मोजकेच लोक आमच्या सोबत होते. पण आता पंचगंगा प्रदुषणाबाबत जागृती झाल्याने सहभाग वाढत आहे. तरीही पंचगंगा प्रदुषीत करण्यात कोल्हापूर व इचलकरंजी शहराचा मोठा वाटा असून तेथील लोकांची उदासिनता दिसून येत आहे, ही खेदाची बाब असल्याचे सांगितले.

अतिशय नियोजनबद्ध आणि प्रत्येकाने वैयक्तिक योगदान देऊन स्वच्छतेला सुरवात केली. यातून सुमारे दोन ट्रॅक्टर ट्रॉली आणि आठ घंटागाड्या इतका कचरा गोळा करण्यात आला. त्यामुळे पंचगंगा घाट परिसरही स्वच्छ व सुंदर झाला.

यावेळी रवी शिवदास-उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रविदास आडसूळ, प्रियदर्शिनी मोरे, संजय राजमाने, प्रकल्प संचालक माने, दिपक गायकवाड, अमर पाटील, अभिजीत पाटील, करवीर पं.स. सभापती राजेंद्र सूर्यवंशी, जि.प. सदस्य कु. प्रियांका पाटील, उपसरपंच भुषण पाटील आदी उपस्थित होते.

1,077 total views, 15 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा