कपिलेश्वर(प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर येथील प्राथमिक शाळेमध्ये मुंबई येथील शुभम फिल्म निर्मित काडसिद्धेश्वर महाराज यांच्या जीवनावरील सोहम या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले.

चित्रीकरणांमध्ये शहरातील मुलांचे शहरामध्ये राहिल्याने गावाकडील रुढी, परंपरा, आजा, आजींचे मुलांचे केले जाणारे मुलांच्या वरील संस्कार काय असतात या भागाचे चित्रीकरण प्राथमिक शाळेमध्ये पार पडली यामध्ये प्रमुख कलाकर- सोनियाची पावले फेम ज्योती नेमसे, सुहास फणसीकर, नवीन प्रभाकर, बालकलाकार- आघा लोंढे, प्राथमिक, माध्यमिक, गावातील नागरिकांनी, शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रीकरणांमध्ये भाग घेतला यावेळी शुभम फिल्म यांच्या टिममार्फत ग्रामपंचायत व नागरिकांचे आभार मानले.