Breaking News

 

 

‘एनआयए’कडून ‘इसिस’शी संबंधित ७ ठिकाणांवर छापे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुख्यात दहशतवादी संघटना ‘इसिस’शी संबंधित असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तमिळनाडूतील कोईम्बतूरमधील ७ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. यामध्ये एका गटाच्या म्होरक्याला करण्यात आली असून तो श्रीलंकेती एप्रिलमध्ये चर्चवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जेहरन हाशीम याचा फेसबुक फ्रेंड असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

इसिसच्या गटांवर गुन्हा दाखल केल्यानंतर एनआयएने हे छापे टाकल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.  आयसीसच्या एका गटाचा प्रमुख हा एनआयएने तपासानंतर अंबू नगर, पोडनूर आणि कुनियामुथूरमधील काही भागांत शोध मोहीम हाती घेतली. आज (बुधवार) सकाळपासून सुरु झालेली शोध मोहीम अजूनही सुरूच आहे.  एप्रिल महिन्यात श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एनआयएने रियाझ अबुबकर याला अटक केली होती.

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील काही पर्यटन स्थळांवर आत्मघाती हल्ले करण्याचा रियाझचा प्रयत्न होता. त्याला पलक्कडमधून ताब्यात घेण्यात आले.  रियाझ हा श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड जेहरन हाशीम याचे व्हिडिओ आणि भाषणे ऐकत असे. आत्मघाती हल्लेखोर बनण्याच्या दृष्टीने तो स्वत:चा दृष्टीकोन तयार करत असल्याचे सांगितले जात आहे. श्रीलंकेत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एनआयएची द्विसदस्यीय टीमने श्रीलंकेला भेट दिली होती. या हल्ल्यानंतर हल्लेखारांपैकी काही काश्मीर आणि भारतातील इतर शहरांमध्ये गेले असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर एनआयएची ही टीम श्रीलंकेत दाखल झाली होती. 

303 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग