Breaking News

 

 

‘पिऱ्हाना’च्या टँकमध्ये फेकून ‘जनरल’च्या किंकाळ्या ‘एन्जॉय’ करीत होता ‘हा’ हुकूमशहा !

नवी दिल्ली (वृत्त्संस्था) : महासत्ता अमेरिकेलाही धमकावणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग हा त्याच्या विक्षिप्त स्वभावासाठी आणि क्रूरकृत्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. पुन्हा एकदा त्याच्या क्रूर आणि निर्दयी स्वभावाचे हिडीस दर्शन जगाला घडले आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका जनरलला चक्क नरभक्षी ‘पिऱ्हाना’ माशांच्या टँकमध्ये फेकले आणि मासे लचके तोडत असताना त्याच्या किंकाळ्या अक्षरशः ‘एन्जॉय’ केल्या.

‘डेली स्टार’ या वृत्तसंस्थेने  माहिती दिली असून जनरलमुळे आपली सत्ता धोक्यात येण्याची शक्यता असल्याची भीती वाटल्यानेच किम जोंगने त्याला पिऱ्हाना माशांच्या हवाली केले. माशांचा हा टँक त्याच्या अंगणातच असून मासे जनरलचे कसे लचके तोडत आहेत हे किम बेडरुमच्या खिडकीतून बघत होता. जनरलच्या प्रत्येक किंकाळीला किम हसत होता. हे दृश्य पाहून त्याचे कर्मचारीही हादरले होते. जनरलचे नावही जाहीर न करण्याचे आदेश किमने दिले आहेत. यामुळे तो जनरल नेमका कोण होता. याबद्दल लोकांची उत्सुकता वाढत आहे. मात्र किम जोंगच्या या क्रूर कृत्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

1,092 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे