Breaking News

 

 

मालवण किनारपट्टीला ‘वायू’ चक्री वादळाचा फटका…

मालवण (प्रतिनिधी) :  अरबी समुद्रात वायू चक्री वादळाचा फटका मालवण किनारपट्टीला बसला आहे. गेले दोन दिवस सुरू असलेल्या वादळी वाऱ्याचा जोर अधिकच वाढला आहे. या वादळामुळे समुद्रातही जोरदार लाटा उसळत आहेत.

किनारपट्टीवर येणाऱ्या अजस्त्र लाटांमुळे मच्छिमार आणि किनारपट्टीवरील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच बंदर विभागाने ग्रामस्थांना व मच्छिमारांना धोक्याची सूचना देणारा तीन नंबरचा बावटा मालवण बंदरात लावला आहे.

दरम्यान, काल (मंगळवार) उशिरा समुद्राच्या पाण्याची पातळीही अधिकच वाढली. त्यामुळे देवबाग, दांडी परिसरात समुद्राचे पाणी घुसले. देवबाग येथे ख्रिश्चनवाडी, श्रीकृष्णवाडी आणि मोबार येथे काही घरांना पाण्याने वेढा दिला. काही ठिकाणी समुद्राचे पाणी थेट रस्त्यावर आले होते. आचरा गाऊडवाडी येथे पुलावरून पाणी वाहत होते.

765 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे