Breaking News

 

 

शिवसेनेऐवजी ‘एनडीए’मध्ये नसलेल्या पक्षाला लोकसभा उपाध्यक्षपदाची ऑफर ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा उपाध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केलेला असला, तरी भाजपने मात्र या मागणीकडे गांभीर्याने पाहिलेले नाहीये. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपने या पदासाठी वायएसआर काँग्रेसला ऑफर दिली आहे.  भाजप प्रवक्ते नरसिम्हा राव यांनी मंगळवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांची विजयवाडा येथे भेट घेऊन प्रस्ताव दिला आहे.

आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर वायएसआर काँग्रेसने जिंकल्या आहेत. भाजपाच्या या ऑफरला अद्याप जगनमोहन यांच्या पक्षाने कुठलेही उत्तर दिलेले नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, जगनमोहन यांनी राजकीय समीकरणांवर विचारविनिमय करण्याचे कारण देत थोडा वेळ मागितला आहे. आंध्र प्रदेशातील स्थानिक बातम्यांनुसार, जगनमोहन रेड्डी आणि नरसिम्हा राव यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली. ही भेट एक औपचारिक भेट सांगण्यात आले मात्र, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यावरुनच नरसिम्हा राव हा प्रस्ताव घेऊन जगनमोहन यांच्याकडे गेले होते, असे सांगण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपाने सर्वाधिक ३०३ जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर ५२ जागा जिंकून काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर २३ जागा जिंकून काँग्रेसचा सहकारी पक्ष डीएमके आहे. तर २२ जागा जिंकणारा वायएसआर काँग्रेस हा चौथा पक्ष आहे. त्याचबरोबर २२ जागांसह तृणमुल काँग्रेसही चौथ्या स्थानावर आहे. त्यानंतर १८ जागा जिंकणारी शिवसेना पाचव्या स्थानावर आहे. १६ जागा जिंकून जदयू सहाव्या स्थानावर आहे. रेड्डी यांनी हा प्रस्ताव नाकारला तर लोकसभेचे उपाध्यक्षपद हे शिवसेना किंवा जदयूला मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा